संगमेश्वर येथील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीला मिळाली तीन वर्षांनी नुकसानभरपाई

0

संगमेश्वर : तालुक्यातील तांबेडी गावातील गोविंद कांबळे यांच्यावर जानेवारी 2017 मधे बिबट्याने घरात घुसून हल्ला केला होता. यात जबर जखमी झालेले कांबळे मरता मरता वाचले. गोविंद कांबळे यांचा प्रस्ताव काही कागदपत्र नसल्याने अपुरा होता. यासाठी आमदार निकम यांनी थेट वनमंत्र्याना साकडे घातले. त्यानंतर सर्व सुत्र झटपट हलली आणि परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यावर रविवारी सकाळी देवरुख येथे आमदार निकम यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचा धनादेश कांबळे यांना सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेश बने हनिफ हरचिकर, बाळू ढवळे पंकज पुसळकर, प्रफुल्ल भुवड, निलेश भुवड, नितीन भोसले, नितीन पाटोळे, मंगेश बंडागले, अमित जाधव, रामू पंदरे, विनोद वाडकर, जितू नलावडे, बाबा मिया जेटी, इम्रान जेटी, परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड, वनपाल संगमेश्वर (देवरुख) सुरेश उपरे, वनरक्षक साखरपा न्हानू गावडे, वनरक्षक दाभोळे मिलिंद डाफळे, वनरक्षक आरवली आकाश कडूकर, वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा सूरज तेली, राहुल गुंटे, वनरक्षक फुणगुस श्रीमती शर्वरी कदम आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here