भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पी. कश्यप कोरिया ओपनच्या उपांत्य फेरीत

0

इंचेऑन (द.कोरिया) : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात कश्यपने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने जागतिक क्रमवारीत २ -या स्थानी असणा-या डेन्मार्कच्या जॉर्गन्सनवर अवघ्या ३७ मिनिटांत जॉर्गन्सचा २४-२२, २१-८ अशी मात केली. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात कश्यपने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने जागतिक क्रमवारीत २ -या स्थानी असणा-या डेन्मार्कच्या जॉर्गन्सनवर अवघ्या ३७ मिनिटांत जॉर्गन्सचा २४-२२, २१-८ अशी मात केली. इंचेऑन सिटी येथे सुरू असलेल्या या ४00, 000 अमेरिकन डॉलर्स रकमेच्या या स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल, सिंधू, साई प्रणित यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले आहे. त्यानंतर भारताच्या आशा कश्यपनेवर होत्या. या अपेक्षांना साजेसा खेळ करत कश्यपने अंतिम चारमध्ये स्थान पटकावले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने अवघ्या ३७ मिनिटांत जॉर्गन्सचा २४-२२, २१-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत कश्यपसमोर जपानचा दिग्गज खेळाडू व अव्वलमानांकित केंटा मोमोटाचे आव्हान असेल. याशिवाय, पुरुष गटात जपानचा दिग्गज खेळाडू केंटा मोमोटा, तैपेईचा चोऊ तियान तर महिला गटात तैपेईच्या तेई, थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉन, चीनची ही बिंगजाओ यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या गेममध्ये मध्यापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली होती. या गेमच्या मध्यानंतर कश्यपने सुरेख खेळ करत एकेक गुणांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला एकवेळ दोघांत १४-१४, १८-१८, २२-२२ अशी बरोबरी होती. अखेर कश्यपने सलग दोन गुणाची कमाई करत हा गेम २४-२२ ने जिंकला. दुस-या गेममध्ये एकतर्फी झाला. सुरुवातीपासून कश्यपने वर्चस्व ठेवले. त्याने हा गेम २१-८ असा जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here