टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी पोलिस अधिकाऱ्यावर अनेक राऊंड फायर केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी संदीपसिंग धालीवाल असे मृत शिख पोलिस अधिकाऱ्याची ओळख पटवली आहे. संदीपसिंग हे गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकन पोलिसात नोकरी करता होते. आरोपी ने गोळीबार केल्यानंतर तो एका शॉपिंग मॉलकडे जाताना दिसला. प्रशासकीय अधिकारी एड गोंजालेझ यांच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी संदीपसिंग धालीवाल हे ड्यूटीवर असताना त्यांनी एक मोटारकार थांबविली होती. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होते. कारमधून बाहेर पडताच हल्लेखोरांनी सिंग यांच्यावर गोळीबार केला. धालीवाल हे अमेरिकेचे पहिले शीख पोलिस अधिकारी होते. आरोपी ने गोळीबार केल्यानंतर तो एका शॉपिंग मॉलकडे जाताना दिसला. घटना घडल्यानंतर तपास अधिका्यांना कारवाई करत हल्लेखोराचा शोध घेतला. तपासावेळी त्यांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर हे फुटेज शहरातील सर्व पोलिसांना शेअर केले. त्यामुळे हल्लेखोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शीख पोलिस अधिकारी संदीपसिंग धालीवाल यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. ह्युस्टनमधील पोलीस अधिकारी संदीपसिंग धालीवाल यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
