‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या सेटवर भीषण आग, अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी

0

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या सेटवर भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचे सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. या सेटला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये सेटचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे चित्रपटातील सर्व कलाकार सुरक्षित आहेत, मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:31 PM 02/Feb/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here