दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ढासळला पूल

0

संगमेश्वर : तालुक्यातील आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे राजिवली येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.44 मधील कुंभारखाणी बुदृक येथील 50च्या दशकातील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या पुलाच्या दुरुस्तीचे काम कडवई येथील ठेकेदार मागील एक महिन्यापासून करत असताना २ फेब्रुवारी रोजी सकाळी येडगेवाडी-चिपळूण व येडगेवाडी-माखजन या वस्तीच्या दोन बस या पुलावरून गेल्यानंतर पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळल्याचे दिसून आले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सध्या या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली असून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करुन वाहतूक वळविण्यात आली आहे.

सकाळी ही घटना निदर्शनास येताच कुंभारखाणी गावचे पोलीस पाटील यांनी संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात व संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांना दूरध्वनीद्वारे कळविले. संगमेश्वर तहसीलदार यांनी माहिती घेण्यासाठी तातडीने तलाठींना पाठवले तर सदर ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कडवई बीट अंमलदार राजेंद्र जाधव व स्वप्निल जाधव उपस्थित होते. पुल ढासळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख उपविभागीय अभियंता पूजा इंगवले व शाखा अभियंता प्रमोद भारती हे घटनास्थळी दाखल झाले आणि ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. ढासळलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी नव्याने पूल बांधण्याच्या सुचना स्थानिकांनी मांडलेल्या तर या मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय अभियंता पूजा इंगवले, शाखा अभियंता प्रमोद भारती यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभारखाणी ते कुचांबे दरम्यानच्या पुलांची पाहणी केली आवश्यक असलेल्या मोऱ्या पावसाळ्यापूर्वी बांधून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान मांडली. यावेळी जि.प सदस्य संतोष थेराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सा.बां शाखा अभियंता विकास देसाई,अक्षय बोरसे,इश्वर बामणे, ग्रा.पं सदस्य दिलीप सुर्वे, पोलिस पाटील राकेश सुर्वे, विनायक सुर्वे, सुनिल सुर्वे, सिध्दांत येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here