शिकारी मृत्युप्रकरणी एकाला न्यायालयीन कोठडी, ९ जणांना जामीन

0

रत्नागिरी : शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळी सुटून शिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली पारवाडी येथे 25 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी 29 जानेवारी रोजी 2 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तसेच 30 जानेवारी रोजी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना नाटे पोलिसांनी राजापूर न्यायालयात हजर केले असता यातील एकास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून 9 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमवार 25 जानेवारी रोजी राजापूर तालुक्यातील नवेदर येथील अनिल शंकर भालवलकर (वय 41) आणि संजय विठ्ठल पड्यार (वय 47) असे दोघेजण आम्ही शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेलो होतो अशी सुरुवातीला माहिती संशयित आरोपी संजय विठ्ठल पड्यार याने दिली होती. यावेळी शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अनिल शंकर भालवलकर याच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता, असे संशयित आरोपी संजय विठ्ठल पड्यार याने सांगितले होते. यामध्ये अजून 9 जण सहभागी असल्याचे दिसून आले होते. नाटे पोलिसांनी त्या 9 जणांवर गुन्हा दाखल केला होता. नाटे पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढण्याचा चंगच बांधला होता. या प्रकरणी संजय विठ्ठल पड्यारसह मयत या 2 जणांवर भादविस कलम 304 सह भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान संजय विठ्ठल पड्यार या संशयित आरोपीला राजापूर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान नाटे पोलिसांनी 2 फेब्रुवारी रोजी अनिकेत अनिल ठुकरुल (वय 32 वर्ष रा. नवेदर भिकारवाडी), योगेश बाळकृष्ण रायकर (वय 28 वर्ष रा. नवेदर भिकारवाडी), संदेश सूर्यकांत पोवार (वय 23 वर्ष रा.कोंडसर बुद्रुक पोवारवाडी), रुपेश धोंडू रांबाडे (वय 5 वर्ष रा.कोंडसर बुद्रुक पोवारवाडी), सिद्धार्थ दत्ताराम तिरलोटकर उर्फ (भाबल्या) (वय 27 वर्ष रा.धाऊलवल्ली दसुरवाडी), संतोष गणपत दळवी (वय 45 वर्ष रा.धाऊलवल्ली पारवाडी), निलेश बबन शेडेकर (वय 31 वर्ष रा.कोंडसर भिकारवाडी), निवृत्तीनाथ शांताराम गोराठे (वय 40 वर्ष रा.नवेदर नवेदरवाडी), अन्य एक आरोपी यांना अटक केली आहे. या सर्वांना राजापूर न्यायालयात दाखल केले असता संशयित आरोपी संजय विठ्ठल पड्यार यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर 9 जणांना जामीन मंजूर केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here