कणकवली: सुलभ शौचालयात महिलांची आर्थिक लूट

0

कणकवली : कणकवली बसस्थानकातील सुलभ शौचालयात महिलांकडून पाच रुपये घेत आर्थिक लुट करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर कोकण विकास संघर्ष  समितीने  आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांना महिलांसमवेत जाब विचारला. शेवटी रविवारपासून महिलांकडून पाच रुपये आकारणी केली जाणार नसल्याचे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले़ कणकवली एसटी आगार व्यवस्थापक दालनात कोकण विकास संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्षा अ‍ॅड. मनाली वंजारे यांच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापक प्रमोद यादव यांची भेट घेत निवेदन दिले.  यावेळी सविता यादव, वासंती तेंडोलकर, सायरा बागवान, नारायण जाधव, अनिल किर्लोसकर, संजय जाधव आदी महिला उपस्थित होत्या. कणकवली बसस्थानक हे मुंबई-गोवा महामार्गालगत आहे़ कणकवली ही मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या सुलभ शौचालयात येतात़  या महिलांकडून पाच रुपये उकळण्यात येतात़  एकीकडे पुरूषांना मोफत मुतारीची व्यवस्था असताना महिलांना का नाही? महिलांना सेवा देण्याची जबाबदारी शासनाची आहे़ एसटी महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष करू नये़ गोरगरीब महिलांनी कुठून पैसे द्यायचे़ ग्रामीण भागातून येणार्‍या महिला, शाळकरी मुली, युवती यांची गैरसोय होता नये. त्यामुळे तात्काळ मोफत सुलभ शौचालयात महिलांना सेवा मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोकण विकास संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड. मनााली वंजारे यांनी आगार व्यवस्थापकांना दिला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here