गुहागर समुद्रकिनारी सॉलिड जेटी तोडण्याच्या कामाला सुरुवात

0

गुहागर : येथील समुद्रकिनारी पतन अभियंता रत्नागिरी विभाग पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन वाढीकरिता बांधण्यात आलेले सॉलिड जेटी पाच महिन्यांनंतर पूर्णतः काढून टाकण्याची रविवारपासून सुरुवात केली. पोकलेनने जेटी तुटत नाही म्हणून भूसुरुंग लावून जेटी तोडण्याचे काम सुरू आहे. पतन अभियंता रत्नागिरी विभाग, पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत बारावा वित्त आयोग सागरी किनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री व विद्यमान आ. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने सन २०१४ मध्ये सुमारे ९६लाख रुपये खर्च करून सॉलिड जेटी उभारली होती. ही जेटी सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आल्याने जेटी काढून टाकण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्याकडून आला आहे. जेटी सीआरझेडचा भंग करून बांधण्यात आल्याची तक्रार गुहागरमधील बळवंत परचुरे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्याकडे केली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here