शेतजमिनीत बळजबरीने उभारले वीजखांब

0

आचरा : आचरा-वरचीवाडी येथील शेतकरी निखिल मोर्वेकर यांच्या शेतजमिनीच्या मध्यभागातून 33 केव्ही वीजवाहिनीसाठी विद्युतखांब टाकण्याचे काम चालू केल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न करूनही ठेकेदारने काम चालू ठेवल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असताना अजूनही आपल्या जागेत महावितरण बळजबरीने काम करत असल्याची माहिती आचरा येथील शेतकरी जागामालक निखिल मोर्वेेकर यांनी दिली. याबाबत न्यायासाठी स्थानिक  लोकप्रतिनधींचेही लक्ष वेधले असल्याचे ते म्हणाले. आपल्या शेतजमिनीच्या मध्यभागातून 33 केव्ही वाहिनीसाठी खांब उभारण्याचे काम चालू केल्याचे समजताच आपण त्याला विरोध केला.जमिनीच्या मध्यभागातून खांब न टाकण्याची विनंती महावितरणच्या कर्मचार्‍यांकडे केली होती. शेतजमिनीत पुरलेल्या खांबांवरुन वीजवाहिनी सुरू झाल्यावर जमिनीचा काही उपयोग होणार नाही.भविष्यात शेतीमध्ये शॉटसर्किट होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता नाही. याबाबत महावितरणला लेखीपत्राद्वारे कळवूनही त्याची दखल महावितरणने घेतली नाही. कुडाळ प्रांताधिकार्‍यांनीही महावितरणला कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेऊन नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. मात्र कोणतीच दखल न घेता महावितरणने काम चालू ठेवल्याची माहिती शेतकरी निखिल मोर्वेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here