सुमित नागलला अर्जेटिना एटीपी चॅलेन्जरचे विजेतेपद पटकावले

0

ब्युनास आयर्स (अर्जेंटिना) : भारताचा उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागलने ब्युनास आयर्स एटीपी चॅलेन्जर क्ले इव्हेंटचे विजेतेपद पटकावले आहे. या 22 वर्षीय नागलच्या कारकीर्दीतील हे दुसरे विजेतेपद असून 2017 मध्ये त्याने प्रथम बंगळूर चॅलेन्जरवर नाव कोरले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 161 व्या स्थानी असणा-या सुमितने अर्जेटिनाच्या फेकुंडो बागानीसचा 6-6, 6-2 असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ब्राझीलच्या जागतिक क्रमवारीत 108 व्या क्रमांकाच्या थिआगो माँटेरोला 6-0, 6-1 असे पराभूत केले होते. या विजेतेपदासह सुमित नागलच्या क्रमवारीत मोठा बदल घडू शकतो. ब्युनास आयर्स एटीपी चॅलेन्जरचे जेतेपद पटकाविणारा सुमित नागल हा पहिला आशियाई खेळाडू ठराला आहे. पाब्लो कुएव्हस, काइल एडमंड आणि पाब्लो अंदुजर या बिगर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी या आधी  ही स्पर्धा जिंकली आहे. दक्षिण अमेरिकेच्या धर्तीवर क्ले कोर्टवर विजेतेपद पटकाविणारा सुमित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here