आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

गणपतीपुळे : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मालगुंड संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. मालगुंड एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक सदानंद परकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी एका प्रतीत परिपूर्ण माहितीसह आपला प्रस्ताव सादर करावयाचा आहे. आलेल्या प्रस्तावांची निवड समितीच्या माध्यमातून छाननी करून आदर्श शिक्षक निवडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी सेक्रेटरी, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, ता. जि. रत्नागिरी यांच्याकडे अर्ज सादर करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here