ब्रेकिंग : राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार

0

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले. सध्या 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:28 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here