पंडित भिमसेन जोशी जयंती प्रतिवर्षीप्रमाणे ४ फेब्रुवारी रोजी होणार

0

रत्नागिरी : भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांची जयंती प्रतिवर्षी दि. ०४ फेब्रुवारी, असून मागील ९ वर्ष सातत्याने हा जयंती दिन रत्नागिरी येथे साजरा केला जात आहे. पंडित भिमसेन जोशी यांचे शिष्य श्री. विजय डाफळे यांनी पंडितजींच्या कुटुंबियाच्या परवानगीने जयंती महोत्सव सुरु केला आहे. यासाठी भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या नियमित वापरातील वस्तु डाफळे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. जयंती दिनाचे औचित्य साधुन या वस्तुचे दर्शन रसिक व पंडितजींचे चाहते घेऊ शकतात. यावर्षी देखील श्रीकलाप्रसाद, गुरववाडी, मिरजोळे येथे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच गायनसेवा गुरुचरणी अर्पण करण्यात येणार असल्याने श्री. विजय डाफळे यांनी कळविले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९६३७६२४०६२ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच कार्यक्रम नियोजित स्थळी सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असल्याचे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here