विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन

0

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. विजू खोटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांची शोले चित्रपटातील कालियाची भूमिका विशेष गाजली. ”सरकार, मैंने आपका नमक खाया है” हा त्यांचा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विजू खोटे यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशी ही बनवाबनवी, आयत्या बिळावर नागोबा अशा प्रसिद्ध मराठी चित्रपट त्यांच्यावर नावावर आहेत. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली रॉबर्टची भूमिकाही गाजली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here