मुलींच्या सन्मानासाठी ‘भारत की लक्ष्मी अभियान’

0

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मीची उपमा देण्यात आली असून,  आपल्या समाजात, कुटुंबात आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या अनेक मुली आहेत.  विविध उपक्रमांद्वारे त्यांचा गौरव करावा आणि ‘भारत की लक्ष्मी’ हा हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर उपक्रमाची छायाचित्रे प्रसारित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संवाद साधताना रविवारी केले. भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना समृद्धी आणणारी, गौरव वाढविणारी म्हणून लक्ष्मीचे स्थान देण्यात आले आहे. आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे स्थान उंचावणार्‍या त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आता उत्सवांचा काळ सुरू झाला आहे, दिवाळीमध्ये सौभाग्य आणि समृद्धीच्या रूपात लक्ष्मीची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे आता आपल्या घरातील कर्तृत्ववान लक्ष्मीचाही सन्मान करावा. त्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम घ्यावे आणि सोशल मीडियावर ‘भारत की लक्ष्मी’ हा हॅशटॅग वापरून संपूर्ण जगाला भारताच्या लक्ष्मीचे कर्तृत्व दाखवावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here