रत्नागिरीत शिवसेना करणार शक्‍तिप्रदर्शन

0

रत्नागिरी : पितृपंधरवडा सरल्यानंतर आता सोमवारपासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात  उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार सुरु होणार आहे. सध्या शिवसेना वगळता या मतदारसंघातून इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराची निश्‍चिती झालेली नाही. मात्र, शिवसेनेचे उमेदवार आ. उदय सामंत शक्‍तिप्रदर्शन येत्या शुक्रवारी (4 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दि. 4 तारखेला उमेदवारी अर्ज भरुन विजयाचा चौकार मारण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. सन 2014 च्या निवडणूकीत शिवसेनेचे उदय सामंत यांनी तब्बल 93 हजार 896 मते मिळवली. प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराचा 39 हजार 447 मतांनी पराभव केला. त्यानंतर सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 60 हजाराचे मताधिक्य मिळवून दिले. या लोकसभा निवडणूकीच्या अगोदरपासूनच आ.उदय सामंत यांनी आपल्या विधानसभेचीही तयारी केली. लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळावे या दिशेने भरारी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणूकीची तयारी म्हणून आ.सामंत यांनी आतापर्यंत सुमारे 4 वेळा मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय, पंचायत समिती गणनिहाय आणि शहरात प्रभागनिहाय बैठका-मेळावे घेऊन मतदारांशी संपर्क साधत शिवसेनेच्या कार्याची माहिती दिली. नुकतीच त्यांनी पाली येथील निवासस्थानी पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी मतदारांशी संपर्क कसा साधयचा याचे नियोजन केले. त्यानुसार, पुन्हा एकदा पदाधिकारी आपापल्या ठिकाणच्या प्रमुख मतदारांना एकत्रित आणून प्रचार सुरु केला आहे. 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरुन विजयाचा चौकार मारण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेनेचा असा झंझावात सुरु असताना विरोधी पक्षांच्या गोटात मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्‍लक असतानाही म्हणावी तशी तयारी दिसून येेत नाही. राष्ट्रवादीकडून नगरसेवक सुदेश मयेकर यांचे नाव पुढे असले तरी पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.शिवसेनेचे उदय सामंत हे प्रतिस्पर्धी असणारच या निश्‍चितेतून मयेकर यांनी वर्षभरापासूनच मतदारसंघात संपर्क सुरु केला आहे. दरम्यान, दि. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 4 ऑक्टोबरला मुदत संपल्यावर दुसर्‍या दिवशी 5 ऑक्टोबरला छाननी होणार असून 7 ऑक्टोबरपयर्र्ंत अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी 8 ऑक्टोबरपासूनच सुरु होणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.  त्यामुळे दि. 4 रोजी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी  उमेदवारी अर्ज सामंत भरणार आहेेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here