स्वच्छ रत्नागिरी अभियानाला गेट वे ऑफ रत्नागिरी मांडवी येथून सुरुवात

0

रत्नागिरी : मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी ४ दिवसांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमेश नायर यांची भेट रत्नागिरीतील विविध आरोग्य समस्यांवर चर्चा केली त्याचवेळी निमेश नायर यांनी शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी पासुन स्वच्छतामोहीम सुरु करु असे ठरविण्यात आले त्यानुसार आज पहाटे साडेसहा वाजता सभापती निमेश नायर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी – कर्मचारी यांच्यासोबत मांडवी समुद्र किनार हजर झाले. मांडवी पर्यटन संस्थेने आवाहन केल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व कारुण्य मरीन एक्सपोर्टचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत मांडवी पर्यटनसंस्थेचे पदाधिकारी आणि मांडवी ग्रामस्थ, समुद्रावर भेळ विक्री करणारे व्यवसायिक या स्वच्छता अभियानामध्ये सहाभागी झालेत. सुमारे दीड दोनशे नागरीकानी संपूर्ण मांडवी समुद्र किनारा दोन तासात चकचकीत करुन सोडला. हॉटेल सी फॅनच्या वतीने अभियान सहभागी नागरीकांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मांडवी येथील मिलिंद शिवलकर यांच्या वतीने अभियान संपल्यानंतर सर्वांना वडापावचे वाटप करण्यात आले. दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर येणारे सांडपाणी, पऱ्या-नाले यांच्या बसविण्यात येणारे सांडपाणी प्रकल्प, पार्किंग व्यवस्था, ८० फुटी हायवे वरील रस्त्यावर वहाणाऱ्या गटाराचे काम तातडीने सुरु करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्यसभापती निमेश नायर मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक बंटी कीर, नगरसेवक नितीन तळेकर, नगरसेविका सौ दया चवंडे, अल्ट्राटेक कंपनीचे डी एस चंद्रशेखर, नीरज खरे, अनिल पुराणीक, भुषण डहाणूकर, संतोष पाटील, अनिल त्रिपाठी, सुहास ठाकूरदेसाई, राजू भाटलेकर, सुरेश पावसकर, रोहीत मायनाक, हर्ष दुडे, श्रेयस कीर, बंड्या सुर्वे, बिपिन शिवलकर, नरेश शिवलकर, संदिप तोडणकर, सौ विद्या वायंगणकर, सौ छाया मोरे, श्वेता धनावडे, समीर शिवलकर, सौ रसिका शिवलकर आदी उपस्थित होते. सुमारे ३ डंपर जमा झालेला कचरा नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री सावर, श्री कांबळे यांच्या टिमने तात्काळ उचलला. मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या वतीने आरोग्यसभापती निमेश नायर यांचे आभार मानण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:18 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here