जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रत्नागिरीतील स्मारके बंदच

0

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संग्रहालये आणि प्रामुख्याने रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मभूमीचे स्मारक खुले करण्याचे आदेशा दिल्यानंतरही स्मारके अजूनही बंदच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे पर्यटन ठप्प झाले होते. आता जनजीवन सुरळीत होत असताना बंद असलेली ऐतिहासिक स्मारके सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्मारके उघडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी श्री. लिमये यांना कळविले होते. मात्र पुरातत्त्व विभागाने लोकमान्य टिळक जन्मस्थळासह थिबा राजवाड्यातील संग्रहालय अद्यापही खुले केलेले नाही. त्यामुळे येणारे पर्यटक प्रवेशद्वारावरूनच परत जात आहेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, स्मारके, संग्रहालये पर्यटक, नागरिकांसाठी खुले करण्याबाबत सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संग्रहालये, लोकमान्य टिळक स्मारक खुले करण्याचे आदेश काढले होते. परंतु पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी खुले करण्याचे आदेश दिलेले नसल्याने अद्याप ती सारी बंद आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here