पुणे : उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावर सोमवारी (दि. ३०) पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने रविवारी वर्तविला. गुजरात येथील कच्छच्या जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या भागांमधील पावसाचा जोर अचानक वाढू शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, विदर्भात काही ठिकाणी मसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असे सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला; तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. पश्चिम राजस्थानातून येत्या ५-६ दिवसांत मान्सून परतण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.
