बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह ३२ तासांनी सापडला

0

दापोली : येथे ३ रोजी मासेमारीसाठी गेलेला मच्छीमार समुद्रात बुडाला होता. गुरुवारी ४ रोजी तब्बल ३२ तासांनी त्याचा मृतदेह हर्णे येथील समुद्रकिनारी सापडला. राजा पद्मा पावसे असे त्यांचे नाव आहे.

दरम्यान, हर्णे फत्तेगड येथील स्थानिक ग्रामस्थ श्री. राजा पद्मा पावसे हे नेहमी मासळी पागायला जात असत. मासळी साठी किनाऱ्याला जाळी लावायची आणि दुसऱ्या दिवशी बोया लावून जाऊन ती जाळी पुन्हा किनाऱ्यावर आणायची आणि त्यात मिळालेली मासळी काढून विकून त्यावर आपलं घर चालवायचं हा पावसे यांचा नेहमीचाच उद्योग होता. यामध्ये ते सगळी मेहनत एकटेच करायचे. कधी कधी सोबत त्याकरिता त्यांची पत्नी सुद्धा जात असे. असेच २ तारखेच्या संध्याकाळी राजा पावसे हे जाळी लावण्यासाठी गेले होते त्यादिवशी त्यांनी जाळी लावली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ तारखेच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जाळीत काहीतरी मासळी आली असेल या हेतूने ते किनाऱ्यावरून ते बोया घेऊन गेले होते असे येथील मच्छीमारांनी सांगितले. जाताना जाळीतून काढलेले मासे ठेवण्यासाठी टोपले तसेच किनाऱ्यावर काढून ठेवलेले होते. घरांमधील नातेवाईकांना वाटले की लावलेली जाळी आणण्यासाठी गेले आहेत परंतु बराच वेळ उलटून गेल्यावर पावसे अजून कसे आले नाहीत म्हणून शोधशोध सुरू झाली. परंतु पावसे यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. म्हणून ग्रामस्थांनी ता.३) सकाळी हर्णे पोलीस स्थानकात राजा पावसे हरवले असल्याची तक्रार दाखल केली. ग्रामस्थांनी पूर्ण किनारपट्टीचा शोध घेतला परंतु काहीही आढळून आले नाही. ता. ४ दुपारी ठीक १:३० च्या सुमारास राजा पावसे यांचा मृतदेह किनाऱ्यावरच समुद्रामध्ये तरंगताना दिसून आला. तब्बल ३२ तासांनी पावसे यांचा मृतदेह सापडला. तेंव्हा ग्रामस्थांनी एकच धावपळ केली आणि सदरचा मृतदेह छोट्या बोटीच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणला. तातडीने रुग्णवाहिकेचे पाचारण करून पावसे यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला. सदरच्या घटनेमुळे परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर हर्णे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी हर्णे पोलीस दुरक्षेत्राचे बिट अंमलदार- श्री. मोहन कांबळे व सुशील मोहिते व हर्णेचे तलाठी – श्री.अमित शिगवण यांनी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here