खेडमध्ये ‘रिपाइं’चे १५ रोजी ठिय्या आंदोलन

0

खेड : तालुक्यातील भडगाव, भरणे-बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतला आहे. बुधवारी तशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी कोकण संपर्कप्रमुख सुशांत भाई सकपाळ, मिलिंद तांबे, विकास धुत्रे, रजनीकांत जाधव, सुरेंद्र तांबे, रेशमा तांबे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:04 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here