कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही?; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

0

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आजच्या काळात सत्य बोलणाऱ्याला गद्दार आणि देशद्रोही म्हटलं जातंय, त्याच्यावर खटला दाखल केला जातो. संजय राऊत म्हणाले, “आमचे सदस्य संजय सिंग, शशी थरूर आणि पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत सादर केलेल्या आभारप्रदर्शनावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “मला वाटते की आयपीसीमधील कलम रद्द करुन देशद्रोह हे एकच कलम ठेवलं आहे. “देशांतर्गत हिंसाचाराच्या प्रकरणातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात आहे. राऊत म्हणाले, की “आपल्या देशात आपल्यासाठी देशभक्त कोण आहे?” अर्णब गोस्वामी, कंगना रनौत? देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे लीक करणारा देशभक्त आहे. ते म्हणाले, “मोदीजींना मोठं बहुमत मिळालं आहे आणि मी त्याचा आदर करतो.” बहुमत हे देश चालवण्यासाठी आहे. पण, बहुमत अहंकाराने चालत नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here