संगमेश्वर-साखरपा रस्त्यासाठी गाव विकास समितीचा आंदोलनाचा इशारा

0

रत्नागिरी : संगमेश्वर-देवरूख-साखरपा रस्त्याचे रुंदीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम शिल्लक आहे. कोरोना लॉकडाउनच्या आधी काम होणे अपेक्षित असताना आता वर्ष उलटून गेले तरी काम झालेले नाही. ते तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा लक्षवेधी सत्याग्रह केला जाईल, असा इशारा गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांनी दिला आहे

या रस्त्याचे काम नियमानुसार व्हावे, यासाठी गाव विकास समितीमार्फत लॉकडाउनच्या आधी देवरूख येथे एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष भोपळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यानंतर रस्त्याच्या कामाला गती आली होती. मात्र लॉकडाउननंतर पुढील कामास गती मिळाली नाही. आजही अनेक ठिकाणी काम बाकी असून रस्त्यावरील डांबरीकरण झालेले नाही. रस्त्याचे काम वेळेत होणे गरजेचे असून या कामाच्या दिरंगाईची चौकशी करण्यात यावी, अशी गाव विकास समितीची भूमिका असल्याचे भोपळकर यांनी म्हटले आहे.नागरिकांना गृहीत धरून कामात चालढकल केली जात असेल तर ते चुकीचे आहे. येत्या १५ दिवसांत या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर गाव विकास समिती याविरोधात आंदोलन करेल, असा इशारा भोपळकर यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here