लांजा भाजपाच्या वतीने महावितरणला निवेदन

0

लांजा : महावितरणने काढलेल्या भरमसाट वीज बिलांमध्ये ग्राहकांना सवलत देण्यात यावी आणि कोणाचेही वीज कनेक्शन कापू नये, अशी मागणी लांजा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. भाजपाच्या वतीने निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, पदाधिकारी हेमंत शेट्ये, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दादा भिडे, ओबीसी सेलचे शहरअध्यक्ष अशोक गुरव, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर शीतल सावंत, जिल्हा चिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, तसेच शहराध्यक्ष प्रमोद करूप, चंद्रकांत मांडवकर, संजय गुरव, रमाकांत सावंत, बन्सी गांधी, प्रवीण सुर्वे, आत्माराम धुमक, समीर कोत्रे, इक्बाल गिरकर, नाना शेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here