दापोली: चारचाकी व रिक्षा अपघातात एकाचा मृत्यू

0

दापोली : दापोली-हर्णे मार्गावरील पाळंदे येथे चारचाकी व रिक्षा यांची धडक बसून अपघात झाला. या बपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालक सुनील नारायण चव्हाण (५८, रा. आसूद) यांचा डेरवण येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नारायण चव्हाण हे आपली रिक्षा घेऊन हर्णेकडून दापोलीकडे येत होते. यावेळी पाळंदे येथील हॉटेल साहील इन जवळील वाकणावर त्यांची रिक्षा आली असता दापोलीकडून हर्णेकडे जाणाऱ्या चारचाकीने रिक्षाला धडक दिली. या अपघातात सुनील नारायण चव्हाण, पूनम बेनेरे (४९, रा.आसूद), जयवंत खेडेकर (६०) व निकिता खेडेकर (४७, दोन्ही रा. सालदुरे) हे जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेले सुनील चव्हाण यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी मोहन कांबळे करीत आहेत.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here