परांजपे संग्रहालयाची दोन दालने १५ फेब्रुवारीपासून होणार खुली

0

दापोली : जालगाव येथील परांजपे संग्रहालयाची दोन दालने येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. गतवर्षी मार्चपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे संग्रहालय बंद होते. जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात संग्रहालयाला जोराचा फटका बसला. त्यामुळे संग्रहालयातील सर्व दालने नेस्तनाबूत झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दापोलीला पर्यटकांचा ओघ वाढला. संग्रहालय पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात मात्र बंद आणि उद्ध्वस्त झालेले संग्रहालय पाहून मन विषण्ण होऊन ते आल्यापावली परत जात असल्याचे दिसते. यासंदर्भात संग्राहक प्रशांत परांजपे यांनी सांगितले की, या संग्रहालयातील पुराणवस्तू दालन १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असून, कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती प्रकल्प आणि मचाणावरील मातीविरहित बाग हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्पही पर्यटकांसाठी पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. उर्वरित दालनांचे काम सुरू करण्यात आले असून दिवाळीपर्यंत सर्व दालनांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा उभारी घेऊन पूर्ण क्षमतेने संग्रहालय सुरू करण्यात येणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:24 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here