नाणीज : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथील वळण उतारावर रोनीत हॉटेलसमोर वॅगनआर कार व दुचाकीची धडक होऊन कुवारबांव येथे राहणारे दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती अशी की, शहजाद इंद्रीस अली पाशा (४०) व अन्वर इद्रीस अली पाशा (२३) दोघे मूळ रा. नवजोत पो. धमरुपूर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश सध्या रा. कुवारबांवरत्नागिरी हे दोघे भाऊ मोलम जुरी करतात. ते दुचारी (एम.एच०८ एजी ४६०८) घेवून पालीला एका दुकानात पीओपी करण्यासाठी गेले होते. ते काम आटोपून कुवारबावकडे चालले होते. कापडगाव येथील वळणावर रोनीत हॉटेलसमोर समोरून आलेल्या वॅगनआर (एम.एच.४६ झेड ४६०२)कारने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य म हाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून दोघा जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. अपघाताची रात्री १२ वाजता पोलिसांत तक्रार देण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कांबळे व झगडे तपास करीत आहेत.
