निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास मनाई

0

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोग, भारत सरकार नवी दिल्ली यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणक जाहीर केली असून २१ सप्टेंबर २०१९ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सव्यवस्था राखणे जरुरीचे असल्याने जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाणेनिहाय असलेल्या स्वसंरक्षणार्थ, शेती संरक्षणार्थ वा अन्य कोणतेही शस्त्र सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास तसेच शस्त्रांचे प्रदर्शन करण्यास महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत मनाई केली आहे. या आदेशाची अवमान्यता करणारा भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here