कणकवली : भाजप नेते नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी स्वत:च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांना कोकणात बोलावले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नारायण राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली आहे. कारण अमित शाह अशी व्यक्ती आहेत की. जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 08-Feb-21