साक्षीदारांना प्रभावित करतील म्हणून चिदंबरम यांना जामीन नाही

0

नवी दिल्ली : आएनएक्स मीडिया प्रकरणात काही आठवड्यापासून तिहार जेलमध्ये असलेल्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. न्यायालयाने आज (दि.३०) झालेल्या सुनावणीत पी. चिदंबरम हे साक्षीदारांना प्रभावित करु शकतात त्यामुळे त्यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी जामीन देण्यास नकार दिला. दरम्यान सीबीआयने त्यांना ताब्यात घेऊन केलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये केली होती. पी. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्यावर आरोप असलेल्या गुन्ह्याचे स्वरुप फार गंभीर नाही तसेच यात जास्तीजास्त शिक्षा ७ वर्षापर्यंत आहे असा युक्तीवाद केला. त्यावर सीबीआयने गुन्ह्याची गंभीरता ही त्याच्या शिक्षेच्या कार्यकाळावर नाही तर त्याचा समाजावर, अर्थव्यवस्थेवर आणि आर्थिक स्थैऱ्यावर आणि देशाच्या एकात्मतेवर काय परिणाम होणार आहे यावर ठरली पाहिजे. असा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आदेश देताना या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आता नाही. पण, चिदंबरम हे साक्षीदारांना प्रभावित करु शकतात असे सांगितले. या प्रकरणी शीना व्होरा हत्या प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आणि आयएनएक्स मीडियाच्या सहसंस्थापक इंद्रायणी मुखर्जी माफीच्या साक्षिदार झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या साक्षीवरुवच पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरु आहे. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here