आजारपणाला कंटाळून जाकिमिऱ्या येथे प्रौढाची आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या जाकिमिऱ्या येथे प्रौढाने आजाराला कंटाळून जुन्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.४५ वा. सुमारास उघडकीस आली. सुनील प्रभाकर पाटील (५४, रा.जाकिमिऱ्या, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गौरिष सुनील पाटील (२५, रा. जाकिमिऱ्या, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 08-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here