२० वर्षे विनाअपघात सेवा देणाऱ्या संजय माचिवले यांना सुरक्षित सेवा बिल्ला प्रदान

0

संगमेश्वर : एसटीचे कर्मचारी संजय माचिवले यांना २० वर्षे सुरक्षित सेवा केल्याने त्यांना सुरक्षित सेवा बिल्ला देण्यात आला. संजय माचिवले हे संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावचे सुपुत्र. ते गेली २० वर्षे गुहागर आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या कालावधीत विनाअपघात एसटी महामंडळाची सुरक्षित सेवा केली. वरिष्ठांनी याची नोंद घेऊन त्यांना गुहागर आगार वाहतूक नियंत्रक आर. जे. पवार यांच्या हस्ते सुरक्षित सेवा बिल्ला प्रदान करण्यात आला

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 08-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here