मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. ‘देशात मोगलाई आहे का’ या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला. ‘अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं’, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं. इतकंच नाही तर ‘परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला’, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 09-Feb-21