नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार?; एकाच वेळेस दोघेही सोनिया गांधींच्या भेटीला

0

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची झूल पांघरल्यानंतर काँँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारीही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले आहेत. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 09-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here