‘विनायक राऊत जिथे दिसतील तिथे फटकारून काढेन’, निलेश राणेंची धमकीची भाषा

0

मुंबई : कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राणेपुत्रांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत फटके देण्याची धमकी दिली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भाजपची युती तुटली. तसेच अमित शाह हे विश्वासघातकी व्यक्ती आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले होते. या टीकेला निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा अक्षरश: शेलक्या शब्दांत उद्धार केला आहे. विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.

‘भाषा बदला अन्यथा जिथे दिसाल तिथे फटकावीन’

काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
2:44 PM 09-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here