रत्नागिरीत सरपंचपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातही सेनेची बाजी

0

रत्नागिरी : रत्नागिरीत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले असून सडामिऱ्यासह राई ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे आरक्षणाकडे डोळे लागले होते. हे आरक्षणदेखील जाहीर झाले आणि भल्याभल्यांचे पत्ते कट झाले. अनेक ठिकाणी खोतकी मोडीत निघाली. त्यामुळे नवीन चेहरे यावेळी ग्रामपंचायतीत विराजमान होणार हे स्पष्ट झाले होते. बुधवारी सरपंचपदाच्या उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने सरपंच निवडणुकीत बाजी मारली. मात्र शिवसेनेचे काळबादेवी, सडामिऱ्या हे गड ढासळले. शेवटच्या क्षणी काही ठिकाणी सदस्यांनी इकडून तिकडे उड्या मारल्याने शिवसेनेच्या काही ग्रामपंचायती ताब्यातून गेल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. त्यामध्ये बसणी, कापडगांव, खानू, दांडेआडोम, पानवल, कोळंबे, वरवडे, जांभरूण, खरवते, हरचेरी, झरेवाडी, कुरतडे, चिंद्रवली, कळझोंडी, गडनरळ, देऊड, गुंबद, खालगांव आदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले आहेत. तालुक्यातील डोर्ले व रिळ या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांचे बॅनर बाजुला ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीवर गाव पॅनेल पुरस्कृत उमेदवार निवडून आले असून गावपॅनेलचेच सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 11-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here