रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध सडामिऱ्या ग्रामपंचायतीत भाजप पुरस्कृत पॅनेलच्या सौ. सायली सूर्यकांत सावंत यांची सरपंचपदी आणि सुनील सोनू पानगले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी नूतन सरपंच, उपसरपंचांचे अभिनंदन केले. यावेळी विकास सावंत, हेमंत माने, सूर्यकांत सावंत, महेश सुर्वे, साई शशिकांत सावंत, अर्पिता सावंत, सुभाषराव सावंत, सुरेंद्र सावंत, सुनोद सावंत प्रदीप सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत आदी भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 11-Feb-21