हातखंबा टॅपतर्फे ‘ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेत सात हजार चालकांवर कारवाई

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा व मि-या-नागपुर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबा यांनी राबविलेल्या ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह मोहिमेमध्ये नशापान करुन वाहन चालकांची तपासणी करुन कारवाई करण्यात आली आहे. हातखंबा येथे वाहन चालकांची अचानकपणे ब्रीथ अॅनालायझर तपासणी मोहिम राबवण्यात आली त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहन चालकांची वैद्यकिय चाचणी पाली ग्रामीण रुग्णालय येथे केल्यावर ७ चालकांचे अहवाल सकारात्मक आले. या ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह मोहिमेमध्ये दोषी आढळलेल्या चालकांना प्रत्येकी २ हजाराचा दंड करण्यात आला. तसेच या चालकांसोबतच अन्य वाहतुकीचे नियम तोडून धोकादायकपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरु शकणा-या १७७ वाहन चालकांचे वाहन परवाना निलंबनासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. शिवाय रस्ते वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी करण्यात यश आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:05 PM 11-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here