मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली; सुनावणी होणार

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपविल्याच्या आरोप प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांना क्लिन चिट दिल्याचा हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. तसेच प्रलंबित गुन्हाची फाईल पुन्हा उघडून सुनावणी करण्याचे आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने याआधी निवाडा राखून ठेवला होता. विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपविल्याचा आरोप करत या प्रकरणी अॅड. सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस देखील बजावली होती.

HTML tutorial

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here