छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करावी; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

0

मुंबई : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्यानंतरचा, एकही सण साजरा झाला नाही. कारण, मार्च महिन्यात कोरोनाच सावट देशावर घोंगायला लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतरही कित्येक महिने देशात लॉकडाऊन राहिला. आता, लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे.

◼️ यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
◼️ मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
◼️ केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी◼️ बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये.
◼️ आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी
◼️ सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
◼️ स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 11-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here