रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लांबवली चेन

0

देवरूख : देवरूख शहरातील केशवसृष्टी ते शिवाजी चौक या रस्त्याने चालत जाणाऱ्या श्रीमती वंदना मोघे (रा. देवरूख कॉलेजमागे) यांच्या गळ्यातील सोन्याची १ लाख ३५ हजार रुपयांची चेन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून नेली. याबाबतची तक्रार देवरूख पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. चालत जात असताना पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने चेन खेचून नेली. मोघे यांना ढकलून देत हे चोरटे मोटारसायकलवरून फरारी झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 12-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here