लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरूणास पोलिस कोठडी

0

रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणातील संशयिताला न्यायालयाने गुरुवारी एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. घटना सन २०१६ ते सन २०२० या कालावधीत घडली आहे. करण महेश शेणवी (२५, रा. करंजारी संगमेश्वर, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, २०१५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची करणशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर करणने तिला लग्नाचे आमिष दाखवून ठाणे, बांद्रा, गणपतीपुळे, आरोग्य मंदिर, कारवांचीवाडी याठिकाणी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. परंतु त्यानंतर करणने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी करण शेणवीला अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी एक दिवसाच्या पोलिस कोठडीत केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 12-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here