चिपळुणात प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

0

चिपळूण : शहरातील पवन तलाव मैदानावर दि. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान उद्योजक मुबीन खोत व वहाब बेबल मित्रमंडळातर्फे चिपळूण प्रीमियर लीग ओव्हरआर्म राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील नामवंत व निमंत्रित बारा संघ सहभागी होणार आहेत. उद्योजक मुबीन खोत यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेची परंपरा दुसऱ्या वर्षीही सुरू ठेवण्यात येत आहे. विजेत्या संघास ५५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ३३ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने होणार आहेत. विजेत्या संघांबरोबरच उत्कृष्ट खेळाडू व प्रेक्षकांसाठीही बक्षिसाचे नियोजन आहे. स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला एलईडी टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना स्मार्ट फोन, सामनावीर खेळाड्स बॅट व टी-शर्ट आदी बक्षिसांबरोबरच रोख रक्कम देण्यात येणार आहे. दिवसभर स्पर्धेतील सामने हे सहा षटकांचे होणार आहेत. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु-ट्यूबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 12-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here