उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजपमध्ये राजीनामास्त्र

0

कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट करीत शिवसेनेला जागा मिळाल्याची बातमी पसरताच मंगळवारी सकाळी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शक्ती प्रदर्शन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाबद्दल घोषणा बाजी करीत या निर्णयाला त्यांनी विरोध  केला. भाजपाच्या सर्वच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामास्त्र बाहेर काढीत सर्वच राजीनामे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. कल्याण-पश्चिम ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यातच विद्यमान आमदाराच्या विरोधात भाजपाच्या इच्छूक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता मुलाखती दिल्याने विद्यमान आमदार पवार याना पक्षांतर्गत विरोध झाल्याने शिवसेनेने हा मतदार संघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले. सोमवारी या मतदार संघाच्या जागेबाबतची अदलाबदलीची सुत्रे जलदगतीने फिरून रात्री उशिरा कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला जागा मिळाल्याची बातमी शहरभर पसरल्याने भाजपच्या गोटात आणखी अस्वस्थता पसरली. मंगळवारी सकाळी शेकडो भाजपाच्या कार्यकत्यांनी विद्यमान आमदार नरेंद पवार यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, या मतदार संघातून भाजपाकडून उमेदवारीसाठी मुलाखती देणारे ही पवार यांच्या उमेदवारी विरोधात, वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात उपस्थित राहून पवारांच्या समर्थनासाठी उपस्थित होते. यानंतर भाजपाच्या सर्वच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामास्त्र बाहेर काढीत सर्वच राजीनामे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here