पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आ. उदय सामंत यांना एबी फॉर्म

0

रत्नागिरी : विद्यमान आमदार आणि शिवसेना उपनेते आ. उदय सामंत यांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असणारा एबी फॉर्म दिला. यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत व खा.संजय राऊत हेही उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीतच आमदार उदय सामंत यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. ४ ऑक्टोबर रोजी आमदार उदय सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेच्या वतीने भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आज आ. उदय सामंत यांनी एबी फॉर्म घेतल्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना देखील त्यांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here