अस्वच्छता पाहून कोल्हापूरकरांनी स्वच्छ केला मांडवी किनारा

0

🔳 पहाटे ४ वाजल्यापासून मांडवी किनाऱ्यावर सुरु केली स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : शहरातील मांडवी किनारी लोकेशनच्या शोधात आलेल्या काही चित्रपटसृष्टीशी सबंधित तरुणांनी येथील अस्वच्छता पाहून किनारा स्वच्छता मोहीम राबवली. कोल्हापूर येथून आलेले हे तरुण संजय पुजारी आणि भरत गौडा या दोघांनी पहाटे ४ वाजल्यापासून मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता सुरु केली. सिमेंटच्या पोत्यांमध्ये दारु बियरच्या बाटल्या, थर्माकोल प्लॅस्टिक आणि लाकडांचा कचरा वेगवेगळा जमा केला. दोघांचे स्वच्छतेचे काम चालु असताना मॉर्निग वॉक साठी आलेले नगरसेवक नितीन तळेकर यांच्या निर्दशनास हे आल्यानंतर मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, बिपिन शिवलकर, नगरसेवक मुन्ना चवंडे , मांडवीतील नागरीक राजन सुर्वे यांना कळविले. सर्वांनी त्या ठिकाणी पोहचुन गौडा आणि पुजारी यांची माहिती घेतली व त्यांच्या कामाचे कौतुक केले त्यांना धन्यवाद देत त्यांच्यासोबत स्वच्छता कामात भाग घेतला. आपल्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी असणारी अस्वच्छता आणि ती दूर करण्यासाठी पर्यटकांनी पुढाकार घेणे हे नक्कीच खेदजनक आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:00 PM 13/Feb/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here