नवी मुंबई : अनधिकृत वीज पुरवठा घेतलेल्या ग्राहकांवर महावितरणच्या विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार काळम पाटील यांच्या मार्फत दिवा येथे अनधिकृत वीज पुरवठा घेतलेल्या सहा मोठ्या विंगवर कारवाई करण्यात आली. यात रोज ५० लाख रूपयांची वीज चोरी होत असल्याचे समोर आले आहे. या वीजचोरीचा अतिरिक्त ताण पडू लागल्याने फिडर, ट्रान्सफार्मर, केबल जाळू लागले होते. वीजचोरीमुळे महावितरणच्या कोट्यवधींच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. यावर आळा घालण्यासाठी महावितरण विभागाने अशा ग्राहकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी चार टीम बनवून एकाच वेळी कारवाई सुरू केली. यावेळी सुमारे २५४ ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला. सहा अभियंत्यांच्या टीमने एकाचवेळी ही कारवाई केली. तर, काल, गुरूवारी ५० ग्राहकांवर कारवाई करत गुन्हा मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज केलेल्या कारवाई बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
