सोमवार मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य

0

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय महामार्गांवरील फी प्लाझामधील सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून “फी प्लाझाची फास्टॅग लेन” म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे एनएच शुल्क अधिनियम 2008 नुसार फास्टॅग लेनमध्ये प्रवेश करणारे फास्टॅग न बसवलेले कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत फास्टॅगशिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात फास्टॅग बसवणे अनिवार्य केले होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here