महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य सभेला रत्नागिरीकरांचा प्रतिसाद

0

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने दि. १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या साहित्य सभेला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. नाट्य अभिवाचन, कविता सादरीकरण, लेखाचे अभिवाचन असे कार्यक्रम यावेळी पार पडले. पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात कार्यक्रम झाला.

सभेच्या उद्घाटन समारंभात मसापचे शाखाध्यक्ष डॉ. सुभाष देव म्हणाले, गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतात. हळूहळू साहित्यिक, रसिक येऊ लागतील. वेळेवर कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून यापुढे दरमहा एक कार्यक्रम करणार आहोत. डॉ. देव यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. भारतरत्न पं. भीमसेन जोशी मंडईतील हमाल, कष्टकर्यांूसाठीही गायनाचा कार्यक्रम करत. कार्यक्रम मोफत असला तरीही दर्जाही उत्तम असायचा. दुसर्याो दिवशी पहाटे एक हमाल त्यांना म्हणाला, भीमप्पा तीर्थ विठ्ठल तेवढा छान झाला नाही. मग भीमसेनजींनी वादकांना पुन्हा वाद्ये जुळवायला सांगून पुन्हा तोच अभंग तासभर म्हटला. . तो रसिक खूष झाला. जोशी यांच्या चरित्रात हा संदर्भ असल्याचे डॉ. देव यांनी सांगितले. आषाढी एकादशी वारी नसली तरी करोनाकाळात विठुरायाने केलेल्या मदतीची कलाकार संकर्षण कर्हा.डे याची कविता त्यांनी यावेळी ऐकवली. कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात करोना महामारीमुळे आपण आभासी दुनियेत जगू शकत नाही, हे वास्तव लोकांना कळले. पुस्तकातील अक्षरे आणि बोललेले शब्द यांचे महत्त्व भरपूर आहे. याकरिता दरमहा कवी, लेखक, संवाद साधायचा, कार्यक्रम करायचे ठरवले आहे. चांगले कार्यक्रम करत राहिलो तर गर्दी जमेल, असेही ते म्हणाले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. ज्येष्ठ लेखिका श्रीमती सुजन शेंडे यांनी स्वलिखित ललितलेखांचे वाचन केले. कलाकार महेंद्र पाटणकर आणि सौ. पूर्वा खालगावकर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटकातील एका प्रवेशाचे सुरेख वाचन केले. ऋता पाटणकर यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. सूत्रसंचालन आसावरी शेट्ये यांनी केले. सुनील बेंडखळे यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here