भारतात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येकाला बाहेरचा रस्ता दाखवणार : अमित शहा

0

कोलकाता : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आज (दि.1) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) लागू करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होणार नाही असे म्हणतात पण, मी तुम्हाला आश्वासित करतो की भारतात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येकाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे वक्तव्य केले. याचबरोबर 370 कलमाचे आणि पश्चिम बंगालचे विशेष नाते असल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शहा यांच्या उपस्थितीत आज बिधाननगरचे माजी महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार सब्यसाची दत्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर आता अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करणार असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली. ममता कितीही विरोध करत असल्या तरी आम्ही घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवणार असे ते म्हणाले. ज्यावेळी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते त्यावेळी ममता घुसखोरांना भारतातून बळजबरीने बाहेर काढले पाहिजे असे म्हणत होत्या आणि आता सत्तेत आल्यानंतर त्या विरोध करत आहेत असा आरोप अमित शहांनी केला. याचबरोबर हिंदू, शिख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन शरणार्थ्यांना घाबरण्याची काही गरज नाही, केंद्राकडून त्यांच्यावर भारत सोडण्याची कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही. कोणत्याही अफवेवर त्यांनी विश्वास ठेऊ नये असे  अमित शहांनी सांगितले. एनआरसी लागू करण्यापूर्वी आम्ही सिटीझन अमेंडमेंट बिल आणून त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. अमित शहा यांनी आपल्या भाषणात 370 कलमाचाही उल्लेख केला. त्यांनी पश्चिम बंगालचे आणि 370 कलमाचे विशेष नाते आहे असे सांगितले. त्यांनी पश्चिम बंगालचे सुपुत्र शामा प्रसाद मुखर्जी यांनीच पहिल्यांदाच ‘एक निशान, एक विधान आणि एक प्रधान’चा नारा दिला होता असे वक्तव्य केले. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here